Sandhya Shanataram Passed Away: मराठी चित्रपटसृष्टीतील ‘पिंजरा’ हा एक आयकॉनिक आणि अविस्मरणीय चित्रपट मानला जातो. या चित्रपटात आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shanataram) यांचे निधन झाले आहे. त्या ८७ वर्षांच्या होत्या. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स वरती पोस्ट करुन याबाबत माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले की, भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ! अभिनेत्रीच्या निधनाने इंडस्ट्रीतही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.(Sandhya Shanataram Passed Away)
Sandhya Shanataram Passed Away: संध्या शांताराम यांचे मूळ नाव विजया देशमुख
1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ या चित्रपटातून अभिनेत्री संध्या शांताराम यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना चकित केले. “अरे जा रे हट नटखट” हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आहे. संध्या शांताराम यांचे मूळ नाव विजया देशमुख होते. या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नसल्याने, गाण्यात दिसणाऱ्या सर्व स्टेप्स संध्या यांनी स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी तयार केल्या होत्या.
Sandhya Shanataram Passed Away: शूटिंगपूर्वी त्या प्राण्यांशी मैत्री
हे गाणे आगळेवेगळे बनवण्यासाठी शांताराम यांनी सेटवर खरे हत्ती आणि घोडे आणले होते. अशा वातावरणात नाचणे अत्यंत धोकादायक असतानाही, संध्या यांनी निर्भयपणे परफॉर्म केलं. प्राणी आवाज आणि गर्दीमुळे अस्वस्थ होऊ शकतात हे माहीत असूनही त्यांनी कोणतीही भीती न बाळगता शूटिंग केले. त्यांनी बॉडी डबल वापरण्यास नकार दिला आणि शूटिंगपूर्वी त्या प्राण्यांशी मैत्री करत स्वतःच्या हातांनी त्यांना केळी-नारळ खाऊ घातले आणि पाणी पाजले होते. त्यांचे हे समर्पण आणि धाडस पाहून व्ही. शांताराम प्रभावित झाले. विवाहित असूनही शांताराम यांना संध्या यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने आणि प्रखर प्रतिभेने भुरळ घातली. त्यानंतर संध्या यांनी शांताराम यांच्या अनेक नामांकित चित्रपटांत काम केले. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘पिंजरा’ आणि ‘अमर भूपाळी’ यांसारखे चित्रपट त्यांचे आणि शांताराम यांच्या कलात्मक सहकार्याचे प्रतीक ठरले.
