महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला त्यानंतर पूरग्रस्तांना प्रशासनाने आता एकरी किमान 30 ते 40 हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी 24 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टमधून केली होती. राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुढल्या आठवड्यापासून विशेष मदत केली जाईल अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. असं असतानाच आता राज ठाकरेंनी एक अत्यंत आगळा वेगळा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला असून पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनोख्या पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतला असून कामालाही सुरुवात झाली आहे.
