Search
Close this search box.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच…, वाचा 24 कॅरेटचा भाव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दसरा अवघ्या एक दिवसांवर आला आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी सोनं खरेदी करणे ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेलं आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 1 लाखांच्या पार गेले आहेत. आज सोनं किती रुपयांनी महागलं व आजचा भाव जाणून घेऊयात.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,18,640 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,08,750 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 88,980 रुपयांवर पोहोचलं आहे.

सोन्याच्या दरातील उच्चांकी वाढीमुळं गेल्या 14 वर्षात सर्वाधिक परतावा दिला आहे. मात्र सोन्याच्या उसळीमागे एक मोठे कारण आहे. ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका सरकारची धोरणं आणि फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरातील कपातीची शक्यता आहे. त्यामुळं सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्याने 11.4 टक्कांचा परतावा दिला आहे. ऑगस्ट 2011नंतर सोन्याने 15 टक्क्यांपर्यंताचा परतावा दिला आहे. हे आकडेवारीवरुन दिसतय की सोन्यात गुंतवणुक करणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरले आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,18,640 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,08,750रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 88,980 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 10,875 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 11,875 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 8,898 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 87, 000 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 94,912 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 71, 184 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,18,640 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,08,750रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 88,980 रुपये

admin
Author: admin

और पढ़ें