Search
Close this search box.

Shirdi Saibaba Sansthan : शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, मोठी रक्कम जाहीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिर्डी – साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने बळीराजाचं खूप नुकसान केलं आहे.

शिर्डी संस्थानने यापूर्वी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवला आहे. 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यात निधीसाठी साई संस्थान देणार 5 कोटी रुपये देणार आहे.

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत शिर्डीचे साई संस्थान मदतीसाठी सरसावले आहे. यापूर्वीही देशातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थाकडून भरघोस मदत दिली गेली आहे. आता राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थानने सामाजिक बांधिलकी पुन्हा जपली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीला येतोय अडथळा
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा राज्य सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे.ई केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.अतिवृष्टी बाधित अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यानं त्यांच्या खात्यावर मदत मिळणार नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे मदतीपासून कोणताही शेतकरी अथवा बाधित वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.दरम्यान कृषिमंत्री भरणे यांच्या या घोषणेवर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.सरकारच्या या निर्णयाचं स्वागत आहे.आता सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी ई केवायसी अट शिथिल करून फायदा नाही ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे

महाराष्ट्रातील पूरस्थिती
महाराष्ट्रातील पुरामुळे सर्व व्यवस्था विस्कळीत झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील एक मुलगी रात्री अचानक आजारी पडली. पुरामुळे मुलीला रुग्णालयात नेण्यात अनेक अडथळे निर्माण झाले, ज्यामुळे तिला पोहोचण्यास उशीर झाला. १५ मिनिटांच्या अंतरावर रुग्णालयात पोहोचण्यासाठी दोन तास लागले. परिणामी, मुलीचा मृत्यू झाला. मुलीचे नाव वैष्णवी योगेश जाधव आहे.

तसेच, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गावे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठाजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. नवदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांना घेऊन जाणारी बस पुराच्या पाण्यात अडकली होती. चालकासह पंधरा महिला भाविकांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले.

admin
Author: admin

और पढ़ें