Search
Close this search box.

MMRDA चा भोंगळ कारभार! मेट्र्रोसाठी बांधलेले खांब पुन्हा पाडणार; 13 स्थानके असलेल्या या मेट्रो मार्गिकेसंदर्भात मोठा निर्णय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईत मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. अनेक प्रकल्पांचे काम सध्या एमएमआरडीएने हाती घेतले आहे. लवकरच मेट्रो 3 मार्गिका सेवेत येणार आहे. त्याचबरोबर ठाणे मेट्रोच्या चाचण्यांनादेखील सुरुवात झाली आहे. मात्र मेट्रोसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मेट्रोसाठी बांधलेले खांब पाडण्याची एमएमआरडीएवर नामुष्की आली आहे.

मेट्रोसाठी बांधलेले खांब एमएमआरडीएने तोडण्याचे काम हाती घेतले आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मेट्रो मार्गिकेचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यासाठी कांजूरमार्गदरम्यान काही खांब उभारण्यात आले आहेत. मात्र यातील काही खांब पाडण्यास मेट्रोने सुरुवात केली आहे.

नेमकं कारण काय?
मेट्रो 6च्या संरचनेत कारशेडच्या अनुषंगाने काही बदल करण्यात आल्याने हे खांब पाडण्यात येणार आहेत. त्यामुळं या खांबाच्या उभारणीसाठीचा खर्च पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे. या मेट्रो प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र कारशेडचा प्रश्न रखडल्याने कारशेडचे कंत्राट अंतिम होऊनही काम मार्गी लागलेले नाही.

मुंबई मेट्रो लाइन 6 ही स्वामी समर्थ नगर (अंधेरी) ते विक्रोळी (ईईएच) दरम्यान 14.477 किमी लांबीची उन्नत मेट्रो लाइन आहे. ही गुलाबी रेषा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि पवई तलावावरून जाणार असून, यात 13 स्थानके असणार आहेत.

अशी असतील स्थानके?
स्वामी समर्थ नगर,आदर्श नगर,जोगेश्वरी (प) . जेव्हीएलआर, श्याम नगर, महाकाली कॅव्ह, सिप्झ व्हिलेज, साकी विहार रोड, रामबाग, पवई लेक, आयआयटी, पवई, कांजुरमार्ग (प), विक्रोळी (ई.ई.एच)

admin
Author: admin

और पढ़ें