‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेत्री रुपाली भोसले (Actress Rupali Bhosale) हिच्या गाडीचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रुपाली भोसले सुखरुप असून भीषण अपघातात रुपाली भोसलेच्या लग्झरी गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, रुपाली भोसलेच्या ज्या गाडीचा अपघात झाला आहे, ती लग्झरी कार अभिनेत्रीनं काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती. याबाबत तिनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना माहिती दिलेली. तसेच, रुपालीनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करुन अपघाताची माहितीही चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वी रुपाली भोसलेनं तिची नवी मर्सिडिज बेन्झ गाडी घेतल्याचा आनंद सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांसोबत शेअर केलेला. आता रुपालीच्या त्याच मर्सिडिज बेन्झ कारचा अपघात झाला आहे. रुपालीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कारच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत Accident झाला, वाईट दिवस असं कॅप्शन दिलं आहे. त्यासोबतच तिनं ब्रोकन हार्टचं इमोजी शेअर केलं आहे. अपघातात रुपालीच्या नव्या कोऱ्या लग्झरी कारचं नुकसान झालं आहे. रुपालीच्या कारच्या बोनेटला डेन्ट आला आहे. तर, समोरुनही तिचं बोनेट डॅमेज झालं आहे. दरम्यान, रुपालीचा अपघात नेमका कसा झालं? याबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो किंवा आयुष्यात घडणाऱ्या आनंदाच्या गोष्टींची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या रुपाली भोसले स्टार प्रवाहवरच्या ‘लंपडाव’ मालिकेत दिसतेय. या मालिकेत तिनं सरकार ही खलनायिकेची भूमिका साकारली आहे. या मालिकेत रुपाली भोसलेसोबत चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
