Search
Close this search box.

लाडक्या बहिणींना आता 40,000 ते 1 लाखापर्यंत कर्ज मिळणार, पण हफ्ता…; व्यवसाय करण्याची संधी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण. या योजनेंतर्गंत महिलांच्या खात्यात दीड हजार रक्कम जमा होते. आता लाडक्या बहिणी या रकमेचा फायदा व्यावसायासाठी करु शकतात. मुंबईत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता कर्जदेखील घेता येणार आहे. काय आहे ही योजना जाणून घ्या.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी 10 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार आहे. या कर्जाचे हफ्ते शासनाकडून मिळणाऱ्या दरमहा दीड हजार रुपयांतून वळते करण्यात येणार आहे. ज्या महिलांना स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे. त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.

अनेकांना लाडकी बहीण योजनेंतर्गंत दरमहा 1,500 रुपये मानधन मिळते. त्या महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज त्यांना मिळणार असून 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करु शकतात. महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार आहे.

मुंबई बँकेमध्ये 16.07 लाख बचत खात्यांपैकी लाडकी बहीण योजंनेतर्गंत 53 हजार 357 महिलांची शून्य शिल्लक खाती उघडण्यात आली असून त्यांच्या खात्यात दरमहा मानधनाची रक्कम जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेचे मानधन जमा होत असलेल्या महिलांनी व्यवसाय करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जाणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें