Search
Close this search box.

Dasara 2025 : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जुळून येतोय शुभ संयोग; ‘या’ 3 राशींना लागणार लॉटरी, बॅंक बॅलेन्स वाढणार दुप्पट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हिंदू धर्मानुसार, विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा (Dussehra 2025) दिवस फार खास मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसऱ्याचा शुभकाळ साजरा करण्यात येतो. त्यानुसार, यंदा 2 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच गुरुवारी विजयादशमीचा उत्सव आहे. हा काळ वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतात. या दिवशी ठिकठिकाणी रावणाचा पुतळा जाळण्यात येतो. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि अधर्माचा अंत केला होता असं म्हणतात.

दसऱ्याचा काळ हा फक्त धार्मिकदृष्ट्याच नाही तर ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने देखील शुभ मानला जातो. जेव्हा ग्रह-नक्षत्रांचा शुभ संयोग या दिवशी जुळून येतो. तेव्हा काही राशींवर देखील याचा थेट परिणाम पाहायला मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार, यंदाचा दसरा फार खास मानला जाणार आहे. कारण या दिवशी रवि योग, सुकर्मा योग आणि धृति योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. त्याचबरोबर, दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी बुध-मंगळ ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे याचा कोणकोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार ते जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी दसऱ्याचा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या नोकरी व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला या काळात पूर्ण करता येऊ शकतात. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालेलं दिसेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा विकास होईल.

कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी विजयादशमीचा दिवस फार खास असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुम्हाला नोकरीत प्रमोशनही मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे.

धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. नोकरीत तुमच्यावर अनेक जबाबादाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

admin
Author: admin

और पढ़ें