अभिनेत्री ते उद्योजिका – प्राजक्ताचा प्रवास
प्राजक्ता माळी केवळ एक प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही, तर ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. कर्जतच्या गौळवाडी गावात असलेलं तिचं फार्महाऊस ‘प्राजक्त कुंज’ नावाने ओळखलं जातं. हा एक सुंदर 3 BHK व्हिला असून त्यात बेडरूम्स, हॉल, स्वयंपाकघर आणि स्विमिंग पूल आहे. हे फार्महाऊस ती भाड्याने देते आणि त्यातून देखील ती भरपूर कमाई करते. रिपोर्ट्स अनुसार या फार्महाऊसचं वीकेंड (शनिवार-रविवार) भाडं साधारणपणे ₹30,000 प्रति रात्र इतकं आहे, तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान भाडं ₹17,000 ते ₹20,000 असतं. या फार्महाऊसची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं बोललं जातं.
स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही उभारलं!
2020 मध्ये प्राजक्तानं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस Shivoham Creations Pvt. Ltd. सुरू केलं. याच बॅनरखाली तिने फुलवंती नावाच्या आपल्या पहिला सिनेमाची निर्मिती केला.
‘प्राजक्तराज’ – पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड
प्राजक्तानं स्वतःचा ‘प्राजक्तराज’ नावाचा पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँडही सुरू केला आहे.महाराष्ट्राच्या विविध भागांत फिरून, पारंपरिक दागिन्यांचा इतिहास आणि डिझाइन यांचा अभ्यास करून ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून तीने हे दागिने इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहेत.
नेटवर्थ ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!
प्राजक्ता माळीकडे अभिनय, अँकरिंग, दागिन्यांचा ब्रँड, प्रोडक्शन हाऊस आणि फार्महाऊस अशा अनेक उत्पन्नाचे स्रोत आहेत. 2022 पर्यंत तिची एकूण संपत्ती (नेटवर्थ) सुमारे ₹16 कोटी ते ₹40 कोटी दरम्यान असल्याचे अहवाल सांगतात. मराठी मनोरंजनसृष्टीत यश आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या प्राजक्ता माळीची ही यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी आहे.
