Search
Close this search box.

पुणे पोलिसांनी चोर, दरोडेखोर अन् गुंडांना गुडघ्यावर आणलं; रस्त्यावरुन काढली धिंड, व्हिडिओ झाला व्हायरल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुण्य नगरी आणि शिक्षणाची पंढरी अशी ओळख असलेल्या पुणे (Pune) शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. माध्यमांमध्येही पुण्यातील गुन्हेगारीच्या (Crime news) घटना झळकत असतात. गेल्याच आठवड्यात पुण्यात भररस्त्यात आंदेकर गँगकडून आयुष कोमकर या युवकाचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनं पुण्यातील गँगवार आणि टोळीयुद्ध चव्हाट्यावर आलं. तसेच, वेगवेगळ्या गँग, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीसही (Police) अॅक्शन मोडवर आल्याचं दिसून येतय. पुण्यात सध्या घरफोडी, वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत, अशाच एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी अगदी नावाप्रमाणे “गुडघ्यावर” आणलं. गुडघ्यावरुन त्यांची धिंड काढण्यात आली होती.

पुणे शहरातील नानापेठ भागात झालेल्या कोमकर-आंदेकर गँगच्या गोळीबारामुळे पुणे शहर हादरले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या घरफोडी, वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. अशा एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी अगदी नावाप्रमाणे “गुडघ्यावर” आणलं. पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडीचा प्रकार झाला होता. तसेच काही मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांनी सुद्धा हैदोस घातला होता अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी त्यांची “वरात” काढली. पुण्यातील हडपसर भागात ठिकाणी या आरोपींनी दहशत निर्माण होईल असे कृत्य केले तिथून या आरोपींचा गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड हडपसर पोलिसांनी काढल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

गेल्याच आठवड्यात 43 जणांना अटक (Pune police arrest)
पुण्यातील परिमंडळ 1 चे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने गेल्याच आठवड्यात मोठी कारवाई केली होती. या पथकाने 24 तासांत 43 सराईत गुन्हेगारांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनेकजण हे शहरातील कुख्यात आंदेकर गँगचे सदस्य असून, काहींवर खून, हत्या प्रयास (कलम 307), दारूबंदी कायदा, शस्त्रबंदी कायदा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नवरात्रीच्या काळात कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख रोखण्यासाठी, विशेषतः टोळ्यांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांची ही मोहीम आहे.

admin
Author: admin

और पढ़ें