मराठवाड्यातील धाराशिव, लातूरसह बीड (Beed) जिल्ह्यातही मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून अनेक गावात नद्यांना आलेल्या पुरामुळे पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळाली. बीड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाने सिंदफणा नदीला महापूर आला असून हा पूर (Flood) ओसरल्यानंतर पुराची दाहकता समोर येत आहे. या पुराच्या पाण्यात शेतीसह (Farmers) खरीपाची पीक वाहून गेली आहेत, तर अनेकांच्या घराची पडझड देखील झाली आहे. बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावाला उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल भेट दिली होती. त्यानंतर, गावात खरंच शासकीय मदत पोहोचली का? याचा रिऍलिटी चेक एबीपी ‘माझा’च्या टीमने केला आहे. त्यावेळी, प्रयागबाईंच्या घरची भींत खचली अन् चूल विझल्याचंही पाहिलं.
नांदूर हवेली गावातील प्रयागबाई गोवर्धन कोरटकर या 65 वर्षीय वृद्ध महिला घरात एकट्याच राहतात. सिंदफणा नदीला आलेल्या पुराने त्यांच्या घराची पडझड झाली. घरावर असलेले दोन पत्रे देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात कोसळले आहेत. याच परिस्थितीत, त्या हालकीच्या, खचलेल्या भींतीत आणि विझलेल्या चुलीत संसार थाटून आहेत, मोडकळलेल्या अवस्थेत राहत आहेत. प्रयागबाई यांच्या दोन मुली विवाह झाल्यानंतर नांदण्यासाठी सासरी गेल्याने सध्या त्या एकट्यात राहातत. अजित दादांनी येथील गावात भेट दिल्यानंतर आजच त्यांना 5 किलो गहू आणि तांदुळाचे वाटप झाले. मात्र, पाच हजाराची आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची आस शासनाच्या आर्थिक मदतीकडे आहे.
नांदूर हवेली गाव सिंदफणा नदीकाठी वसलेले असले तरी आत्तापर्यंत या नदीचे पाणी गावात कधीच आले नाही. मात्र, यंदा केवळ दोन दिवस झालेल्या पावसाने होत्याच नव्हतं केलं. शेतीचं नुकसान झालंच, मात्र घरात देखील पाणी आलं आहे. त्यामुळे आता हीच परिस्थिती अनेकांच्या घरात असून प्रत्येकाकडून आपल्या परीने ती आटोक्यात आणली जात आहे. पाच किलो गहू तांदूळाने काय होतं, काहीतरी ठोस आर्थिक मदत पाहिजे. दादा येऊन बघून गेले आता काय देतील, जसे जमेल त्या शब्दात येतील ग्रामस्थ महिलेने आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
गावातील शाळाही बंद (Beed flood in school)
गावातील घरांची दुरावस्था झालीच. मात्र शाळेत देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांची शाळा बंद आहे. शाळेतील संपूर्ण शालेय साहित्य पावसात भिजून गेले आहे. त्यामुळे, गावातील तरुण एकत्र आले असून गावातील गावगाडा पूर्ववत आणण्यासाठी झटत आहेत, असे मोडून पडलेला संसार पुन्हा उभारण्यासाठी, आपल्या ताठ कण्याने सर्वजण झोकून देऊन काम करत आहेत.
पालकमंत्री
बोर्डीकर
परभणीतील पूरग्रस्त गावात
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सलग तिसऱ्या दिवशी परभणीतील पूरग्रस्त मानवत पाथरी गंगाखेड तालुक्यातील साळापुरी, थार,रामपुरी, ब्रम्हपुरी यासह अनेक गावांना भेट देवून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. महत्त्वाचं म्हणजे थार रामपुरी साळापुरी आदी गावांच्या परिसरातील नदीवर कमी उंचीच्या पुलांमुळे गावकऱ्यांना अडकून पडावं लागत आहे, हे पूलही लवकरच केले जाणार असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. तसेच, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 52 पैकी 52 मंडळांनाही मदत मिळणार असल्याचं त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केलं आहे.
