माहाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव,माण आणि कोरेगाव तालुक्याला पावसाने झोडपून काढलं आहे. मे महिन्यापासून आज पर्यंत तुफान पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील सतत पडत असलेल्या पावसामुळे या भागातील शेतीचे नुकसान झाल आहे. अनेक शेतामध्ये तळ्यांचे स्वरूप आल आहे. घेवडा,सोयाबीन, मका,उडीद त्याच बरोबर ऊस पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मागील तीन चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरेगाव तालुक्यातील साप गावातील विजय जाधव या शेतकऱ्याचा ऊसाला आणि घेवड्याचा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले सोयाबीन गेले त्यानंतर त्यांनी घेवडा लावला तो देखील मुसळधार पावसाने कुजून गेलं आहे. त्याच बरोबर दोन एकरातील ऊस देखील आडवा झाला आहे. तर, अनेक ठिकाणी ऊस उरमळून पडला आहे त्याच बरोबर शेतातील माती देखील वाहून गेली आहे. त्यामुळे खूप मोठं नुकसान या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. अद्याप या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते.
मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातील निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या
सोलापूर जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. यानंतर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे पूरग्रस्त ग्रामस्थ हैरान झाले. गेल्या पाच दिवसापासून अनेकांच्या घरातील पाणी पाठीमागे सरले नाही. त्यामुळे या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्ह्यातील निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या. सुरुवातीला मुख्यमंत्री माढामध्ये दाखल होताच प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून पूरस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री निमगाव मध्ये पोहोचले. त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून पूरग्रस्त भागाची पाहणी केली, ही पाहणी केल्यानंतर दलित वस्तीला भेट देत नुकसान ग्रस्त पूरग्रस्तांशी बातचीत केली. यानंतर ज्या दारफळ मध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना एअरलिफ्ट केलं, त्या परिसराला भेट दिली. त्याचबरोबर सीना नदीच्या काठावरून पाहणी केली. यावेळी दारफळ गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना भूमिका मांडण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी दारफळ ग्रामस्थांशी संवाद साधत सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यामुळे कोणीही काळजी करण्याचे कारण नाही असं आश्वासन दिले.
