Search
Close this search box.

ताडोबातील सफारी सामान्यांना न परवडणारी,नवे दर ऐकून डोक्याला हात माराल; 1 ऑक्टोबरपासून लागू!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे. येथे नवी सुधारित शुल्क रचना आणण्यात आली असून ती 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. सफारीच्या वाढीव दरांमुळे हा रोमांचक अनुभव श्रीमंतांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे. कुटुंबासह वाघदर्शनासाठी खर्चाची जुळवाजुळव करुन येणाऱ्या मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी हे स्वप्न आता धूसर झाले आहे.

सफारी शुल्कात वाढ
ताडोबातील जिप सफारीचे सरकारी शुल्क 3500 रुपये (6 जणांसाठी) आहे, तर खासगी जीप भाडे 2500 ते 7500 रुपये आहे. प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 150 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 450 रुपये आहे. कॅमेरा शुल्क 250 रुपये असून, मोबाइल वापरावर 5000 रुपयांचा दंड आकारला जातो. ही वाढ मध्यमवर्गीयांना परवडणारी नसल्याने नाराजी व्यक्त होतेय.

पर्यटकांना वाघदर्शनाचे आकर्षण
माया, मटकासूर, सोनम, मधू, छोटा मटका यांसारख्या वाघांमुळे ताडोबा पर्यटकांना भुरळ घालतो. गाभा आणि बफर क्षेत्रात सहज वाघदर्शन होत असल्याने हा व्याघ्रप्रकल्प देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

कधी झाली सुरुवात?
1955 मध्ये स्थापन झालेला ताडोबा आणि 1986 मध्ये जोडले गेलेले अंधारी अभयारण्य यांनी मिळून 1727 चौरस किलोमीटरचा हा प्रकल्प तयार केला. येथे 90 हून अधिक वाघ, बिबटे, स्लॉथ बेअर आणि 195 पक्षी प्रजाती आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें