Search
Close this search box.

Beed Crime: वाल्मिक कराडच्या राईट हँडला पोलिसांकडून मोठा दिलासा, गोट्या गित्तेवरील मकोका रद्द

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील सहदेव सातभाई यांच्यावर झालेल्या खुनाच्या प्रयत्न आणि लुटीच्या प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराड (Walmik Karad) समर्थक रघुनाथ फड गँगवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली होती. या प्रकरणात एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले होते. मात्र, आता या खटल्याला नवे वळण मिळाले असून, अपर पोलिस महासंचालकांनी या टोळीतील पाच आरोपींवरील मकोका (MCOCA) रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे.

कोणावरील मकोका रद्द?
पोलिस कारवाईत समाविष्ट असलेल्या फड गँगमधील पाच जणांवरील मकोका रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळख असणारा नंदगौळ येथील रहिवासी गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते या सर्व आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आला आहे.

कोणावर मकोका कायम?
टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि त्याचा सहकारी धनराज उर्फ राजाभाऊ फड यांच्यावरील मकोका मात्र कायम ठेवण्यात आला आहे. या दोघांविरुद्धही संघटित गुन्हेगारीचा विस्तृत इतिहास असल्याचे पोलिसांनी आधी स्पष्ट केले होते.

कारवाईचा पूर्वइतिहास
गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांनी बदनाम होत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मकोकांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली होती. या चार गँगपैकी एक असलेल्या फड गँगवर कडक कारवाई करत सात जणांवर मकोका लावण्यात आला होता. आता त्यापैकी पाच आरोपींवरचा मकोका रद्द झाल्याने संपूर्ण प्रकरणच अधिकच गोंधळात टाकणारे ठरत आहे.

गोट्या गित्ते अजूनही फरार
गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या टोळीतील आरोपींवरील मकोका अचानक रद्द झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रशासनाने आणि पोलिसांनी या निर्णयामागची कारणमीमांसा अद्याप स्पष्ट केलेली नाही. या प्रकरणातील गोट्या गित्ते अजूनही फरार आहे. आता फड गँगमधील पाच जणांचा मकोका रद्द करण्यात आल्याने या प्रकरणात पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
बीडच्या परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 18 ऑक्टोबर 2023 रोजी तडोळी येथील शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांना जीव घेण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, फरशी आणि काठीने मारहाण केली होती, ज्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर सहदेव सातभाई यांच्या खिशातील २ लाख ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, तसेच त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणात वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते, रघुनाथ फड, धनराज उर्फ राजाभाऊ फड या सात जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

बीड जिल्ह्यात एकूण चार गँगवर मकोकाअंतर्गत कारवाई
– 11 जानेवारी रोजी वाल्मिक कराड व घुले गँगवर मेकोकाची कारवाई

– 27 जानेवारी रोजी बीडच्या आठवले गँगवर मकोकाची कारवाई

– 20 मार्च रोजी आष्टीतील भोसले गँगवर मकोकाची कारवाई

– 10 मे रोजी परळीच्या फड गँगवर मकोकाची कारवाई

admin
Author: admin

और पढ़ें