स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षण जाहीर झाले आहे (ZP President Reservation). ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट (IIIDEM) येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी असलेल्या आरक्षणाची संपूर्ण यादी
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
