Search
Close this search box.

पुणे पोलिसांची मध्यरात्री कारवाई, बंडू आंदेकरच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; 77 तोळे सोनं अन्…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर याला पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. बंडु आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर गुरुवारी मकोका अंतर्गंत कारवाई करण्यात आली. तसंच, गुन्हे शाखेने आणखी एक झटका देत सोनं, रोकड, चांदी आणि जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. आंदेकरच्या घरात मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.

आयूष कोमकर खून प्रकरणात गुन्हे शाखेने आंदेकर टोळीच्या म्होरक्या आयुष कोमकर खून प्रकरणात गुन्हे शाखेने आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर यांच्या पुण्यातील घरावर छापा टाकला. या झाडाझडतीत ६७ लाखांचे दागिने, २ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चांदी, मोटार, तसेच जमीन व्यवहाराशी संबंधित करारनामे, कर पावत्या व बँक कागदपत्रे असा कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

67 लाखांचे दागिने, 2 लाखांची रोकड
कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घराची पोलिसांनी घेतलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज हाती लागला आहे. पोलिसांनी तब्बल 67 लाखांचे सोन्याचे दागिने, चांदी, 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या, असा मोठा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय आंदेकरने केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही इसार पावत्याही पोलिसांना मिळाल्या आहेत.

काय आहे प्रकरण?
गृह कलहातून गुंड बंडू आंदेकर याने कट रचून स्वतःच्याच नातवावर हल्लेखोरांकडून गोळीबार केला. त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्यांचा वर्षाव करीत महाविद्यालयीन तरुण आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर (19, रा. नाना पेठ) याचा खून केला. ही घटना गणेश विसर्जन पूर्वसंध्येला नाना पेठेत घडली. त्यानंतर आंदेकर हा ट्रॅव्हलने प्रवास करत कुटुंबाला घेऊन देव दर्शनाला गेला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने 8 जणांना अटक केली आहे.

कुख्यात आंदेकरसह टोळीविरूद्ध मोक्का
पुणे, कौटुंबिक वादातून नातवाचा खून घडवून आणणार्‍या कुख्यात बंडू आंदेकर याच्यासह 13 जणांच्या टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच आंदेकरच्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून महानगरपालिकेसोबत पत्रव्यवहार केला आहे. त्याद्वारे टोळीचा आर्थिंक कणा मोडण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, गुन्ह्यात मदत करणार्‍या प्रत्येकाविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें