Search
Close this search box.

Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा ॲक्टिव्ह; राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी पावसाचे अलर्ट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यात गेल्या महिन्याभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून विदर्भ, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात राज्यभर पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसात विविध जिल्ह्यांना हाय अलर्ट दिले आहेत. आज सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच बहुतांश मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.

हवामान विभागाचा अंदाज काय?
अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. तसेच बंगालच्या उपसागरातही पूर्व मध्यभागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल, असे हवामान विभागाने वर्तवले आहे. यावेळी वाऱ्याचा जोर 40 ते 60 कि.मी. प्रति तास राहणार असल्याचाही सांगण्यात आलंय.

पुढील पाच दिवस कुठे पाऊस?
10 सप्टेंबर: अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली – येलो अलर्ट.

11 सप्टेंबर: सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली – येलो अलर्ट.

12 सप्टेंबर: पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट.

13 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.

14 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट.

पुढील पाचही दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढेल, तर उर्वरित भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

admin
Author: admin

और पढ़ें