पुण्यातील मानाचा पहिला कसबा आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ठरलेल्या वेळे आधी अलका चौकात पोहचल्याबद्दल पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांच अभिनंदन करण्यात आलं. यावेळी पुण्यात विसर्जन मिरवणूकीच्या वेळेवरुन बरीच चर्चा पहायला मिळत होती. मात्र ग्रामदैवत कसबा आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी यांनी वेळ पाळल्याबद्दल त्यांच कौतुक होतय.
मानाचा पहिला कसबा गणपती अलका चौकातुन विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय.
मानाचा पाचवा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर पुणे महानगरपालिका सेवकवर्ग गणेशोत्सव समिती मंडळाचा गणपती बेलबाग चौकात येतोय..
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती श्री केसरी वाडा गणपती बैलबाग चौक पोहोचत आहे ..
ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचं स्वागत होत आहे..
