Search
Close this search box.

Anushka Moni Mohan Das मोठी बातमी: अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, मुंबईजवळ मालिकांमधील अभिनेत्री रंगेहात सापडली!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नी मोहन दास (Anushka Moni Mohan Das) हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन बनावट ग्राहक तयार केले. आरोपींनी ग्राहकांना मुंबई–अहमदाबाद महामार्गालगतच्या काशीमिरा येथील एका मॉलमध्ये बोलावले होते. पोलिसांनी रंगेहात सापळा रचत आरोपींना पैसे स्वीकारताना पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले.

बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका-
अटकेत आलेली अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (वय 41) असं नाव आहे. तर पोलिसांनी सुटका केलेल्या दोन महिला कलाकार, ज्यांनी टीव्ही मालिकांमध्ये तसेच बंगाली चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यांना ताब्यात घेऊन आश्रयगृहात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 370(3) (मानव तस्करीसंबंधी) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, रॅकेटमागील इतर व्यक्ती, दलाल आणि नेटवर्कबाबत तपास सुरू आहे.

रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता-
पोलिसांनी सांगितले की, “हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवले जात होते. आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती. तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.” ही घटना मनोरंजन विश्वाला धक्का देणारी आहे. कारण वेश्याव्यवसायासारख्या घृणास्पद कृत्यात एका अभिनेत्रीचा सहभाग उघड झाल्याने सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांचा तपास वाढवला गेला असून या रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

डान्सबारवर कारवाई करत 5 बारबालांची सुटका-
महत्वाची बाब म्हणजे काल काशीमीरा पोलिसांनी डान्सबारवर कारवाई करत 5 बारबालांची सुटका केली आहे. शहरातील काशीमीरा परिसरात मध्यरात्री महामार्गालगत असलेल्या “टार्जन डान्सबार”वर काशीमीरा पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बारच्या आत बनवलेल्या दोन गुप्त केव्हेटीचा पर्दाफाश करून त्यामधून 5 बारबालांची सुटका केली आहे. याशिवाय बारमध्ये काम करणाऱ्या एकूण 12 बारबालांचीही पोलिसांनी मुक्तता केली. तसेच, बार मालक, मॅनेजर, वेटर आदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीद्वारे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. रेडदरम्यान पोलिसांनी या गुप्त केव्हेटी शोधून काढत त्यातील मुलींची सुटका केली. या धाडीत पोलिसांनी बार मालक, मॅनेजर, वेटर आदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अशा अवैध बारमाफियांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें