मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी आपल्या उपोषणासाठी जरांगेंनी मुंबई गाठली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पोहचताच जरांगेंनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केल्याची घोषणा केली. सरकारने मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही, मग सरकारने गोळ्या घातल्या, वीरमरण आलं तरीही चालेल मागे हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
मुंबई ही मराठी माणसांची राजधानी आहे न्याय मागायला तो सुरत गुहाटी ला जाणार का? खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. फडणवीस सांगतो होत की आमचं सरकार आलं तर न्याय देऊ दुसरे जे आहेत त्यांनी सांगितलं महाराजांची शपथ घेतली होती. मुंबई ते आता आले आहेत त्यांची मागणी मान्य करावी. आमचे सरकार पडून तुमचे सरकार आणले तुम्ही. सरकार ज्यांच्या हातात आहे त्यांना विचारावा माझ्या हातात काही नाही. त्यांच्या पक्षात त्यांच्या बंदुकीचे टोक कुणाकडे आहे? बंदूक ठेवणारे कोण आहे? हे फडणवीस यांनी सांगावे. पुन्हा पुन्हा CM झाले तरी प्रश्न का सुटत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांना फसवण्यात आले. यामुळे सरकारने भूमिका घ्यायला हवी. गणेश उत्सव सुरू आहे ती इथे दंगल करण्या करिता आले नाही. आरक्षण देऊ जे म्हणाले होते ते गावी पळाले आहेत? येऊन आंदोलकांना भेटावे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
आंदोलक काही दहशत वादी नाही त्यांना अपेक्षा असेल विघ्नहर्ता मागण्या मान्य करेल. सरकारने हे आंदोलन अजून चिघळू देऊ नये. मुंबईतील हॉटेल आंदोलकांना देऊ नये असे आदेश पोलिसांनी हॉटेल चालकांना दिले आहेत. जी आश्वासन मागच्या वर्षी सरकारने सरकारने दिली होती आती ती पूर्ण करावी. सरकार मध्ये वाटा घेताना काही वाटत नाही मग शिंदेंनी दिलेली आश्वासन फडणवीस का पूर्ण करत नाही? मुंबईकरांना त्रास होऊ नये ही सगळ्यांची भूमिका मात्र सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नये. लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन चिघळेल असं ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील म्हणाले. ज्यांनी मराठा समाजावर सामनातून टीका केली. त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. तसंच त्यांच्यात हिंमत होती तर मुख्यमंत्री असताना का हिंमत दाखवली नाही. असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.
