Ganeshotsav News Lalbaugcha Raja 2025 Donation On First Day: मुंबईतील गणेशोत्सवाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असलेल्या ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांची बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यानंतर दर्शनाची रांग सुरू करण्यात आली. पहाटेपासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली. ‘लालबागच्या राजा’ला भाविकांनी पहिल्या दिवशीच भाविकांनी भरभरुन दान दिल्याचं पाहायला मिळत आहे. भाविकांनी दान केलेल्या वस्तूंमध्ये सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश असून त्याची मोजदाद आता सुरू करण्यात आली आहे.
