‘लालबागचा राजा’चं मनोभावे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंचा जनसागर उसळतो. काही सेकंदासाठी तरी ज्या ‘राजा’चं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण तास न् तास रांगेत उभे असतात. तर गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटी आणि व्हिआयींची गर्दीही वाढताना दिसतेय. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेशत्सोवाच्या पहिल्याच दिवशी अनेक व्हिआयपींनी दर्शन घेतलं. यात आता एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सह आणखी काही अभिनेत्रींनी दर्शन घेतलं. पण जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवारही जॅकनिलसोबत दर्शनाला आले होते.
जॅकलिन फर्नांडिस तसंच पार्थ पवार यांनी एकत्र लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी जॅकलिन देसी लुकमध्ये दिसून आली. राजाचे दर्शन घेताना तिनं डोक्यावर ओढणी घेतली होती. तसंच मनोभावे पूजा केल्याचंही पाहायला मिळालं. मात्र याच वेळी पार्थ पवार यांच्या एका कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. पार्थ पवारांनी त्यांच्या खिशातून काही नोटा काढल्या आणि जॅकलिनच्या हातात दिल्या. यानंतर जॅकलिननं त्या नोटा बाप्पााच्या दानपेटीत टाकल्या. यानंतर दोघांनी चरणस्पर्श करत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि दोघेही तिथून निघाले.
