Search
Close this search box.

Anil Ambani: अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईडीनंतर आता सीबीआयने (CBI) देखील उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले आहे. याआधी कर्ज घोटाळाप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. त्यानंतर आज सीबीआयने अनिल अंबानी यांच्या जवळपास सहा ठिकाणी छापे टाकले आहेत.

अनिल अंबानींच्या ठिकाणांवर सीबीआयचे छापे का ?
1. येस बँकेनं दिलेल्या 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप

2. अनिल अंबानींनी मंजूर कर्ज अन्य कंपन्यांत वळवल्याचा आरोप

3. अनिल अंबानींनी कागदपत्रे देण्यास मागितला होता 10 दिवसांचा वेळ

4. दहा दिवसांचा वेळ न देता सीबीआयकडून आज 6 ठिकाणांवर छापे

5. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अन्य निगडीत ठिकाणी छापे

काय तपास यंत्रणेचा दावा काय?
कर्जाची रक्कम कथितपणे इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली आणि मनी लाँड्रिंगच्या कक्षेत येणाऱ्या विहित उद्देशाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरली गेली, असा आरोप आहे. या छाप्यांमध्ये अनेक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे की रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी येस बँकेकडून कोणतीही पुरेशी हमी न घेता मोठी कर्जे घेतली आणि शेल कंपन्यांद्वारे पैसे इतर कामांवर खर्च केले गेले. यापूर्वी, या प्रकरणात सीबीआयने दोन एफआयआर दाखल केले होते, त्यानंतर ईडीने तपास सुरू केला.

admin
Author: admin

और पढ़ें