Search
Close this search box.

Nashik Crime : मसाज पार्लरच्या नावाखाली भलतेच प्रकार, नाशिक पोलिसांनी छापा टाकला अन्… पाच मुलींची सुटका

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक देहव्यापारावर छापा टाकून मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच पीडित मुलींची सुटका केली आहे. मुंबई नाका परिसरातील मेट्रोझोन समोर “आरंभ स्पा” या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

छाप्यात मसाज पार्लर चालवणारी महिला खुशबू परेश सुराणा हिला ताब्यात घेण्यात आले. पीडित महिलांची चौकशी केली असता, त्यांना मसाज पार्लरच्या आडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलांमध्ये कानपूर, दिल्ली, मिझोराम, बिहार आणि नाशिक येथील महिलांचा समावेश आहे.

खुशबू सुराणा हिच्याविरोधात यापूर्वीही पिटा व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर आता मुंबई नाका पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

5 पीडित मुलींची सुटका
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पीसीबी एमओबीच्या पथकाने सदर स्पावर छापा टाकला. या छाप्यात 5 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सपोनि विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, शेरखान पठाण, नामदेव सोनवणे तसेच पोलिस अंमलदार गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, प्रजित ठाकूर, नीलिमा निकम, लिला सुकटे, वैशाली घरटे, हर्षल बोरसे आणि दीपक पाटील यांनी संयुक्तरीत्या पार पाडली. दरम्यान, शहरातील इतर स्पा सेंटर, मसाज पार्लरमध्ये पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. या पुढे देखील अशाच कारवाया सुरु राहणार, असा इशारा नाशिक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Nashik Crime : ग्रामसभेत राडा, नाशिक पोलिसांकडून दहा जणांना अटक
दरम्यान, नाशिक तालुक्यातील गोवर्धन ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरु असताना दोन गटांत राडा झाल्याची घटना घडली उघडकीस आली होती. सरपंच गोविंद डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ग्रामसभेमध्ये रेकॉर्डिंग करण्याच्या प्रश्नावरून वादाला सुरुवात झाली. यावेळी सरपंच गोविंद डंबाळे यांनी रेकॉर्डिंगला विरोध केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यावर आक्षेप घेतल्याने या वादाला तोंड फुटले आणि त्यानंतर परस्परांमध्ये बाचाबाची झाल्याने वाद वाढून त्याचे परिवर्तन हाणामारीत झाले होते. यावेळी दोन्ही गटांकडून महिला व पुरुषांमध्ये थेट हाणामारी झाली. आता या प्रकरणी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ॲट्रॉसिटी, बेकायदेशीरपणे जमाव जमवून दंगल घडवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें