Search
Close this search box.

कोकणातही मुसळधार! कोकण रेल्वेची वाहतूक मंदावली, ‘या’ ट्रेन उशिरा, मुंबई-गोवा महामार्गही विस्कळीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळतोय. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाऊस झालाय. पावसामुळं काही ठिकाणी जिवीतहानीदेखील झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला आहे. कोकणातदेखील मुसळधार पाऊस बरसतोय.

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वे मार्गांवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या एक्सप्रेस तसेच पॅसेंजर गाड्या उशिराने धावत आहेत. कोकण कन्या – 2 तास 15 मिनिट, मेंगलोर मुंबई – 3.38, रत्नागिरी दिवा – 1.10, गरीब रथ – 2.34, मंगला एक्सप्रेस – 1.00, spl उदना एक्सप्रेस – 3.29 जबलपूर सुपरफास्ट 1.00 या गाड्या उशिराने धावत आहेत.

रायगडमध्ये रस्ते वाहतूकीला फटका
मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. माणगावजवळ कळमजे येथील घोड नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या पुलावरून जड अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ छोटी वाहने इथून सोडली जात आहेत. मोठ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारी रात्रीदेखील या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. 5 तासानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली मात्र आता पुन्हा नदीची पाणी पातळी वाढल्याने धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई वरून येणारी मोठी वाहने पाली निजामपूर मार्गे माणगाव या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात.

कोल्हापूरात पावसाचा जोर
कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा, राधानगरी तालुक्यासह तुळशी, कुंभी, पाडगाव, चिकोत्रा, घटप्रभा, धामणी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले असून त्यातून साडेअकरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी आपले पात्र सोडले असून अनेक नद्यांचे पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. कोल्हापूर – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावरती मांडूकली जवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर – राजापूर हा राज्य मार्ग देखील नदीच्या पाण्यामुळे बंद झाला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें