हवामान खात्याने मुंबई, ठाणे,रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केले असून पुढील 48 तासात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थिती काळजी घ्यावी, गरज असल्यासच घराबाहेर पडावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये काय सांगितलं आहे?
“सतर्क रहा, काळजी घ्या…..मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर आणि मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. आज पावसाची तीव्रता वाढली असून मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान खात्याने मुंबई, ठाणे,रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केले असून पुढील 48 तासात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थिती काळजी घ्यावी, गरज असल्यासच घराबाहेर पडावे,” असं एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.
