Search
Close this search box.

मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तास महत्त्वाचे, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढलाय. पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी परिसरात येत्या 3-4 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं अवाहन कर्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

संततधार पावसामुळे मुंबईची रस्ते वाहतूक मंदावलीय. तसंच लोकल वाहतूकही धीम्या गतीनं सुरु आहे. मुंबईत अंधेरी सबवेमध्ये दोन ते अडीच फूट पाणी साचलंय. तर सायनमधील गांधी मार्केट आणि हिंदमाता या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय.

मुंबई उपनगरांतही जोरदार पाऊस सुरू आहे. भांडुपमधील एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर दादर परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात झालीय. मुंबईच्या दादर परिसरातही जोरदार पाऊस पडतोय.दादरच्या पारसी कॉलनी परिसरात, दादर टीटी सर्कल भागात पावसाचं पाणी साचलंय.

मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर
मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडण्यात आलेले आहे. तर, दुपारच्या सत्रातील शाळा आता भरणार नाहीत.

रेल्वे वाहतूक मंदावली
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली असून ठाण्याहून सीएसएमटी तसेच कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका थेट आता मध्य रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय. घाटकोपर कुर्ला सायन भागामध्ये मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे.

महापालिकेकडून आपत्कालीन क्रमांक जाहीर
भारतीय हवामान खात्याने आज सकाळी १० वाजता दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरात पुढील तीन ते चार तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की योग्य ती काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर कृपया घराबाहेर पडणे टाळावे. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या मदत सेवा क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.

admin
Author: admin

और पढ़ें