Search
Close this search box.

मुंबईत रेड अलर्ट, कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज, अलर्ट जारी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा (Dahihandi) मुहूर्त साधत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबईसह (Mumbai) राज्यभरात दमदार पाऊस झाल्याचं दिसून आलं. राज्यातील अनेक ठिकाणी, नद्यांना पूर आला असून नाले, ओढे भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी मुंबईतही आज मध्यरात्रीपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग पाहायला मिळाली. भारतीय हवामान खात्याने (IMD forecast) विदर्भ, मराठवाडा, कोकणसह, मध्य महाराष्ट्राला पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. तसेच, उद्या संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट असेल, तर पुढील काही दिवस कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला असल्याची माहिती केंद्रपमुख शुभांगी भुते यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. तर धारणसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. या पावसाचा काही ठिकाणी फायदा झाला आहे. तर काही ठिकाणी मात्र या पावसाने बळीराजाचं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, संभाव्य पावसाचा इशारा लक्ष्यात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबईसह कोकणातही दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असून सोबतच, पूर्व पश्चिम ट्रफ तयार झालाय. त्या पार्श्वभूमीवर आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईचा ऑरेंज अलर्ट अपग्रेड करत रेड अलर्ट जारी केला गेलाय, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख, शुभांगी भुते यांनी दिली. उद्या संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट असेल, तर पुढील काही दिवस कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही भुते यांनी सांगितले. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला असून रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच, सातारा आणि पुण्यातील घाट परिसरासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्हीकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मांजरा प्रकल्प 80 टक्के भरला
जोरदार पावसामुळे बीडच्या केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प 80 टक्के भरला असून आगामी दोन दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशा स्थितीत धरणात पाण्याची आवक कायम राहिली तर दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते. बीड, धाराशिव, लातूर व कर्नाटकातील बिदर या जिल्ह्यात मांजरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे, प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पाटबंधारे विभागाकडून याबाबतचे पत्र संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें