Search
Close this search box.

नांदेडमध्ये पाऊस जोरदार, पाण्यात अडकली थार; भींत कोसळून ग्रामपंचायत सदस्यासह 2 ठार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून नांदेड (Nanded) जिल्ह्यातही मुसळधार पावसाने नदी-नाले भरुन गेले आहेत. तसेच, विविध जलाशय देखील भरुन वाहत असून नद्यांनाही पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पावसाच्या (Rain) पाण्याने भींतीत ओलावा येऊन भींत कोसळल्याची दुर्घटना जिल्ह्यातील कंधार तालुक्यात घडली. या अपघातात 2 जण ठार झाले असून ग्रामपंचायत सदस्य महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. किनवट तालुक्यातील बोधडीजवळ स्कूलबस पावसाच्या पाण्यात अडकली होती. तर, हदगाव-हिमायतनगरधील अंडरब्रीजवर चक्क थार गाडी पावसाच्या पाण्यातून वाहत आली आहे.

नांदेड जिल्हयात सकाळपासूनच जोरदार पाऊस सूरू आहे. शहरातील हिमायतनगर तालुक्यात हदगाव-हिमायतनगर रस्त्यातील अंडरब्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या पाण्यातून एकाने थार कार नेण्याचा प्रयत्न केला. पण, येथील ब्रीजमध्ये पाणी जास्त असल्याने कार मध्येच बंद पडली आणि पाण्यात अडकली. पाण्यात अडकल्यानंतर ही थार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत असल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव जवळची ही घटना आहे.

बस अडकली पाण्यात, चालक बेपत्ता
जिल्ह्यातील किनवट तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला असून नदी नाल्यांना पूर आला आहे. बोधडी ते सिंदगी रस्त्यावर शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यात अडकली. पाण्याचा जोर वाढल्याने काही अंतरापर्यंत ही स्कूल बस वाहून गेली, नंतर एका ठिकाणी बस अडकून पडली. सुदैवाने बसमध्ये चालकाशिवाय कोणी नव्हते. मात्र, बसमधील चालक बेपत्ता असून त्याचा शोध सूरू आहे. येथील कोठारी नदीला देखील पूर आला असून या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेती जलमय झाली आहे.

भींत कोसळून दोघांचा मृत्यू
कंधार तालुक्यातील कोटबाजार गावात घराची भींत पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कंधार तालुक्यात ही घटना घडली, कोटबाजारचे माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर व त्यांचा पत्नी ग्रामपंचायत सदस्य यांच्या घराची भींत अंगावर पडून दोघांचाही मृत्यू झाला आहे. कंधारमध्ये देखील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, या घटनेमुळे कोटबाजार परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे देखील ढगफुटी सारखा पाऊस झाला. याशिवाय पैनगंगा नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. माहूर येथील धानोडा पुलावरुन पैनगंगेचे पाणी वाहत आहे. त्यामुळे, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहतूक बंद असल्याने माहूर शहराचा संपर्क तुटला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें