हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात महायुतीत धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाजप जिल्ह्याध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीमध्ये काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजप जिल्ह्याध्य गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आपली पोळी भाजून घेत खिशे भरायचा धंदा सुरु
काल कळमनुरीमध्ये आढावा बैठक घेतली होती. यबाबत जास्तीची माहिती मंत्री मेघना बोर्जीकर यांनी नव्हती.या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांची लाज काढली. तसेच एसडीएम, तहसीलदार, बीडीओ यांच्यासोबत खालच्या शब्दात बोलणे, तुम्हाला लाज आहे का? अशी भाषा भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी वापरल्याचे संतोष बांगर म्हणाले. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आपली पोळी भाजून घेत खिशे भरायचा धंदा जिल्हाध्यक्षांनी केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे. माझा मुख्यमंत्री आहे असं जिल्हाध्यक्ष सांगत आहेत मी तुम्हाला सस्पेंड करणार असं ते सांगत असल्याचे बांगर म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ काचासारखे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ काचासारखे आहेत. त्यांच्या निदर्शनास आल्यास जिल्हाध्यक्षांची उचल बांगडी केल्याशिवाय ते राहणार नाहीत असं संतोष बांगर म्हणाले. मी बैठक घेतलेली नाही, मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करु नका. घेऊन जाऊ नका कालच्या बैठकीमध्ये त्या जिल्हाध्यक्षांनी ब्लॅकमेल करण्याचं काम केल्याचे बांगर म्हणाले. मेघना बोर्डीकर यांचा काहीही संबंध नाही हा बैठकीचा खेळ म्हणजे फक्त ब्लॅकमेलसाठी होता असेही बांगर म्हणाले.
दरम्यान, संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहे. संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या विविध वक्तव्यामुळं कायम चर्चेत असतात. अशातच आज देखील त्यांनी थेट भाजपच्या जिल्हाध्यक्षांवरच गंभीर आरोप केले आहेत. भाजप जिल्ह्याध्य गजानन घुगे यांच्यावर बांगर यांनी गंभीर आरोप केले आहेत. गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे.
