मध्य प्रदेशातील सोनम रघुवंशी हे प्रकरण अजून लोक विसरले नसताना अजून एक धक्कादायक प्रकरण मुंबईत उघडकीस आलं आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीची हत्या केली आहे. अपघात झाल्याच बनाव करुन तिने या प्रकरणात दिशाभूल केली मात्र तिच्या अल्पवयीन मुलीने आईचं भयानक कृत्य सर्वांसमोर आणलं. त्यानंतर पोलिसांनी तिला पतीच्या हत्येप्रकरणात अटक केली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पत्नीचं तिच्या नवऱ्यासोबत बऱ्यात काळापासून संबंध चांगले नव्हते. दोघांमध्ये सतत भांडण होत होती. (wife kills husband with help of lover Extramarital affair goregaon Mumbai Crime news)
असा काढला पत्नीने पतीचा काटा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गोरेगावच्या आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरे हिचं तिच्या नवरा भरत लक्ष्मण अहिरे सोबत बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. राजश्री अहिरे यांचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. राजश्री आणि चंद्रशेखर यांनी मिळून भरतला संपवण्याचा कट रचला. 15 जुलैच्या रात्री चंद्रशेखरने भरतला गोरेगाव पूर्वेतील एका ठिकाणी बोलावले. दोघांनीही दुसऱ्या आरोपीच्या मदतीने भरतला मारहाण केली. पोटाची नस अन् छातीची हाडं तुटेपर्यंत भरतला मारहाण करण्यात आली. त्यानंतर नवऱ्याला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरी घेऊन गेली. इथे त्याला तीन दिवस उपचाराशिवाय तिने त्रासात ठेवलं. भरतची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली पण तिने त्याला रुग्णालयात नेलं नाही. शेवटी भरतने उपचाराशिवाय श्वास सोडला.
जर कोणाला सांगितलं तर मुलीला मारून…
या महिलेचे निदर्यपणा इथे थांबत नाही, अर्धमेल्या पतीला राजश्री मुलींना जीवे मारण्याची धमकी देत होती. तुला मारहाण झाल्याचे कोणाला सांगितलं तर तुझ्या मुलांनाही मारून टाकेल अशी ती सतत धमकी देत होती. सततच्या धमकीमुळे भरतची प्रकृती खालावत होती.
मुलीने उघड केलं आईचं क्रूर कृत्य…
भरतची 12 वर्षांची मुलगी श्रेयाने पोलिसांना सांगितलं की, आईने बाबांना शौचालयाजवळ बोलावले. जिथे तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगाने भरतला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या पोटातील नस तुटली, छातीची हाडे तुटली आणि यकृताचे खूप नुकसान झाल्याचं तिने सांगितलं.
पत्नीने सर्वांची केली दिशाभूल
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेची क्रूरता तिच्या दोन मुली आणि 3 वर्षांच्या मुलाने पाहिली. त्यांनी वडिलांच्या स्थितीबद्दल नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा राजश्रीने दावा केला की भरत दुचाकी अपघातात जखमी झाला आहे, पण पोलिसांना राजश्रीच्या दाव्यावर शंका आली. पोलिसांनी जोडप्याच्या मुलांशी बोलले तेव्हा सत्य उघड झाले. दरम्यान पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा साथीदार रंगा अजूनही फरार आहेत. दोघांचाही शोध सुरू आहे.
