Search
Close this search box.

आनंदवार्ता! ऐन सणासुदीच्या दिवशी सोनं सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे दर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोन्याच्य दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. MCX वर आज सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. तर, घसरणीनंतरही सोन्याचे दर एक लाखावरच स्थिरावले आहे. आज फक्त 50 रुपयांनी दर घसरल्याने किंचितसा बदल झाला आहे.

टॅरिफ रेट आणि जागतिक घडामोडी याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. सोमवारपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 50 रुपयांनी घसरून 1,01,350 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 50 रुपयांची घट होऊन 92,900 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 40 रुपयांची घट होऊन 76,010 रुपयांवर पोहोचले आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 92,900 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,01,350 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,010 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,290 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,135 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,601 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 74,320 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81,080रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,808 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 92,900 रुपये
24 कॅरेट- 1,01,350 रुपये
18 कॅरेट- 76,010 रुपये

FAQ
1) 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?
-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते (8.4% इतर धातू मिसळलेले).
-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते (25% इतर धातू).

2) मुंबई आणि पुण्यात सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
– सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प).
-विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
-मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
-खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.

3) सोन्याच्या किंमती दररोज किती वेळा बदलतात?
सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.

admin
Author: admin

और पढ़ें