कबुतरांना दाणापाणी देण्यावर हायकोर्टानं बंदी कायम ठेवलीय. असं असतानाही मुंबईत दादर इथल्या कबुतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य देण्याची नवी शक्कल लढवण्यात आलीय. कबुतरांना खाद्य देण्यासाठी वाहनाचा वापर केला जातोय. वाहनाच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य दिलं जातंय.
वाहनाच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य दिले जात आहे. स्थानिकांनी हटकल्यानंतर आणखी 12 वाहनं आणून कबुतरांना खाद्य टाकणार अशी मुजोरीही खाद्य टाकणा-यांची पाहायला मिळतेय. त्यामुळे कोर्टानं बंदी घातली असतानाही कबुतरांना खाद्य कशासाठी? हे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन नाही का असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान स्थानिक नागरिकांनी कबुतरांना खाद्य टाकणा-यांना विरोध केलाय.
कबुतर खाना परिसरात बंदोबस्त वाढवला
दरम्यान, कबूतर खाना येथे कबुतरांना दाणा टाकण्याच्या विरोधात कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतरही काही व्यक्तींकडून या कायद्याच्या निर्णयाचे उल्लंघन केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. आज सकाळी कबूतर खाना परिसरात गाडीच्या छतावर ट्रेमध्ये कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार समोर आल्यानंतर कबुतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथकासह मुंबई महापालिका प्रशासनाचे काही अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत.
दरम्यान, दादरमधील कबुतर खान्यावर लावण्यात आलेली ताडपत्री हटवण्यात आली होती. जैन समाजाने पालिकेच्या कारवाईच्या विरोधात उभं केलं होतं. काही स्थानिकांच्या मागणीनुसार आरोग्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर कबूतरखाना बंद करण्यात यावा अशी मागणी होती, त्यानुसार न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेने या कबूतर खान्याावर कारवाई केली, मात्र कबूतरखाना खुला ठेवण्यात यावा किंवा कबुतरांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जैन समाजाची आहे. मात्र न्यायालयाने कबुतर खान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.
1) दादर कबुतरखान्यावर बंदी का घालण्यात आली आहे?
बॉम्बे हायकोर्टाने कबुतरांना खाद्य देण्यामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांमुळे (जसे की श्वसनाचे आजार, कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे रोग) आणि सार्वजनिक त्रासामुळे 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील सर्व कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे.
2) वाहनांद्वारे खाद्य देणे हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे का?
होय, हायकोर्टाने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास स्पष्ट बंदी घातली आहे. वाहनांद्वारे खाद्य देणे हे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे आणि यासाठी दंड किंवा एफआयआर दाखल होऊ शकते.
3) स्थानिक नागरिकांचा याला विरोध का आहे?
स्थानिकांचे म्हणणे आहे की कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार (जसे की हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस) होतात, सार्वजनिक ठिकाणे घाण होतात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांनी कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती.
