एका 40 वर्षांच्या व्यक्तीने त्याच्या मेव्हुणीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याच्या आरोपांतर्गंत अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपीसोबतच पत्नीलादेखील अटक केली आहे. पत्नीवर आरोप आहे की, पतीचे गुन्हे लपवण्यासाठी आणि घरातच बहिणीची डिलिव्हरी करण्याच्या आरोप तिच्यावर आहेत. या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
2024पासून वारंवार होत होता बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि दोन्ही आरोपी एकाच घरात राहत होते. पीडितेने पोलिसांना सांगितले की, बहिणीच्या नवऱ्याने 2024 ते या वर्षातील जुलैपर्यंत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिने तिच्या मोठ्या बहिणीकडे याबाबत तक्रार दिली तेव्हा तिने तिलाच धमकी देत शांत बसण्यास सांगितले.
पत्नीने घरीच केली बहिणीची डिलिव्हरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या बहिणीनेच पतीचे कृत्य लपवण्यासाठी पीडित तरुणीला घराबाहेर जाऊ दिले नाही. तिची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली नाही. तिने घरीच मुलीची डिलिव्हरी केली. मात्र जेव्हा तिची तब्येत आणखी बिघडली तेव्हा तिला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक
रुग्णालयाकडून पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. एका पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबानुसार, पीडित तरुणी व तिचे बाळे दोघांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींनी पोक्सोअंतर्गंत आणि बीएनएस संबंधीत कायद्यांततर्गंत अटक केली आहे. पोलिसांनी पीडितीच्या मोठ्या बहिणीवर गुन्हा लपवणे आणि पुरावे मिटवणे, पीडितेला धमकावणे असे आरोप लावले आहेत.
सोलापुरात विवाहितेवर अत्याचार
सोलापुरात एका विवाहितेवर भर दिवसा घरात घुसून अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेवर दुष्कर्म करणाऱ्या 48 वर्षांच्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. विवाहित महिला घरात एकटी असताना जबरदस्तीने घरात प्रवेश धक्काबुकी केली. तसंच, तू मला खूप आवडतेस असे म्हणत घरातील बेडरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. विवाहित महिलेने सदर प्रकाराला विरोध करताच घडलेली घटना कोणाला सांगितल्यास नवऱ्याला आणि मुलाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
