कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला (Madhuri Elephant Kolhapur) गुजरातच्या वनतारामध्ये (Vantara Elephant) सोपवण्यात आले. यावेळी हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भावूक झाले आहे. या हत्तीणीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली. तसेच महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant Kolhapur) पुन्हा आणण्यासाठी सतेज पाटील, राजु शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात एक लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महादेवी हत्तीणी संदर्भात मोठी हालचाल सुरु झाल्याचं दिसत आहे. वनतारा प्रकल्पाचे सी.ई.ओ. विहान करणी आणि त्यांची टीम नांदणीसाठी रवाना होणार आहेत. विहान करणी आणि त्यांची टीम कोल्हापूर विमानतळावर येऊन नांदणीला जाणार असून यावेळी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत. त्यामुळे महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीला येणार की नाही?, याबाबत चर्चा रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली, त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे सोपवण्यात आली.
कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ नाराज-
दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज झाले. कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो. या मठात मागील 33 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सांभाळ करण्यात आला. मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आलं आहे. हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्याचे हायकोर्टानं दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं, मात्र तिथही त्यांना निराशा मिळाली होती.
सतेज पाटील यांची पोस्ट काय?
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात एक लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केली. दिनांक 1 ऑगस्ट (शुक्रवार) रात्री 8 वाजेपर्यंतच ही स्वाक्षरी मोहीम सुरू राहणार ! नांदणी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते या सर्व फॉर्मचे शनिवारी सकाळी 10 वाजता नांदणी येथे पूजन होईल. शनिवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता कोल्हापूरातील रमणमळा पोस्ट ऑफिसमधून स्पीड पोस्टद्वारे हे सर्व फॉर्म राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठविले जाणार, असल्याची माहिती सतेज पाटील यांनी पोस्ट करत दिली आहे.
