Search
Close this search box.

Nishikant Dubey On Varsha Gaikwad: वर्षा गायकवाड नडल्या, राज ठाकरेंकडूनही कौतुक; आता लोकसभेत निशिकांत दुबे म्हणाले, ही…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पटक पटक के मारण्याचं वक्तव्य करून मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांना मराठी हिसका दाखवण्यात आला आहे. संसद भवनात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यासह प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी निशिकांत दुबे यांना लोकसभेच्या आवारात घेरलं होतं. वर्षा गायकवाड यांच्या या भूमिकेचं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील कौतुक केलं. त्यानंतर आता काल (29 जुलै) लोकसभेत निशिकांत दुबे यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.

लोकसभेत निशिकांत दुबे बोलत असताना वर्षा गायकवाड सतत काहीतरी बोलत होत्या. यावर समोरुन रनिंग कॉमेंट्री चालू राहिली तर कामकाज कसे होणार?, असा सवाल निशिकांत दुबेंनी उपस्थित केला. तसेच या वर्षा गायकवाडला कुणीतरी सांगा, लॉबीमध्ये जे चालतं ते हसत-मस्करीत असतं, या कुणी हसलं तर त्याचीही बातमी करतात, असा एकेरी उल्लेख करत निशिकांत दुबेंनी वर्षा गायकवाड यांच्यावर टीका केली. निशिकांत दुबे यांच्या या विधानानंतर वर्षा गायकवाड देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.

लोकसभेच्या लॉबीमध्ये नेमकं काय घडलेलं?
वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी लोकसभेच्या लॉबीमध्ये निशिकांत दुबेंना घेरलं होतं. मराठी भाषिकांविरोधातली तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही कुणाला आणि कसे आपटून आपटून मारणार?, तुमचे वागणे योग्य नाहीय, असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी सुनावलं. यानंतर वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. त्यावर आप तो मेरी बहन है, असं म्हणत निशिकांत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले होते.

राज ठाकरेंनी वर्षा गायकवाड यांचे मानले आभार-
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांचे पत्र लिहित आभार मानले. मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना, संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात. याबद्दल बरंच मनापासून आभार, असं राज ठाकरे म्हणाले.

admin
Author: admin

और पढ़ें