Search
Close this search box.

Maharashtra Politics: शिंदे गटाचे चार, भाजपमधूनही दोघे रडारवर; ‘रमीसम्राट’ कोकाटेंसह ‘या’ आठ मंत्र्यांची विकेट पडणार, सामनमधून सनसनाटी दावा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यातील राजकारण पुन्हा एकदा जोरदार घडामोडींच्या वळणावर असल्याचा दावा करत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांची ‘विकेट’ लवकरच पडणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काही नेते व मंत्री आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, तर काहींवर कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांना बाजूला करून नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली जाईल, असाही दावा करण्यात आला आहे. 100 दिवसांच्या कार्यक्रमातही यांची समाधानकारक नसल्याची दावा करण्यात आला आहे. सामनाने ‘हिटलिस्ट’वर असलेल्या मंत्र्यांची नावे स्पष्टपणे दिली आहेत. यामध्ये माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, नरहरी झिरवळ, नितेश राणे, जयकुमार गोरे, भरत गोगावले आणि दादा भुसे यांचा समावेश आहे. या मंत्र्यांविषयी झालेल्या वादग्रस्त घटनांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भविष्यातील राजकीय शक्यता
सामना दैनिकाने असा दावाही केला आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मोठा राजकीय ‘धक्कातंत्र’ राबवण्याच्या तयारीत असून, मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची चर्चा आहे, तर सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीपद दिले जाऊ शकते, अशीही अटकळ वर्तवण्यात आली आहे.

वादात असलेल्या मंत्र्यांची पार्श्वभूमी
माणिकराव कोकाटे
सातत्याने वादग्रस्त विधाने करत सुटलेल्या आणि विधानसभेत जुगार खेळताना सापडल्याने संतापात भर पडली आहे. अजित पवार यांनीही त्यांच्या गच्छंतीवर थेट बोलले नसले, तरी सुतोवाच नक्की केले आहेत.

संजय शिरसाट
मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी नोटांची बंडले दिसून आल्याने वादात अडकले आहेत. त्यापूर्वी हाॅटेल लिलावामध्येही त्यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांच्या मुलावरही आरोप करण्यात आले. माणिकराव कोकाटे आणि संजय शिरसाट सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी आहेत.

योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम सावली बारमुळे अडचणीत आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्यावर सातत्याने कडाडून हल्लाबोल केला आहे.

नरहरी झिरवळ
नरहरी झिरवळ यांच्यावर कार्यकर्त्यांशी असलेला संवाद अभाव आणि क्षेत्रातील अपयशाचे आरोप होत आहेत.

नितेश राणे
अत्यंत वादग्रस्त वक्तव्यांनी रडारवर असलेल्या नितेश राणे यांच्याही मंत्रीपदावर पाणी फेरले जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

जयकुमार गोरे
महिलेकडून झालेल्या आरोपानंतर जयकुमार गोरे सुद्धा वादाच्या केंद्रस्थानी आले होते. जयकुमार गोरे यांना ग्रामविकास खात्याचा कारभार देण्यात आला आहे.

दादा भुसे
हिंदी सक्तीच्या निर्णयाने आणि शालेय शिक्षण विभागातील अनावश्यक निर्णयांमुळे आणि त्यामधून निर्माण झालेल्या वादांमुळे दादा भूसे यांना फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.

admin
Author: admin

और पढ़ें