Search
Close this search box.

कल्याण प्रकरणात मोठा ट्विस्ट! तरुणाने मारहाण करण्याआधी रिसेप्शनिस्टनेच

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कल्याण येथे मराठी तरुणीला मारहाण प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. परप्रांतीय तरुणाने खासगी रुग्णालयातील रिसेप्शनीस्टला लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. रिसेप्शनीस्ट तरुणीनेच पहिले आरोपीच्या वहिनीला थोबाडीत मारली असल्याचे समोर आले आहे.

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरातील एका बाल चिकित्सालयातील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घटली होती. गोकुळ झा असं या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज गोकुळ झा याला न्यायालयातदेखील हजर करण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. या घटनेच्या आधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

कल्याण पूर्वमध्ये एका क्लिनिकमध्ये घडलेल्या घटनेमध्ये आता नवीन वळण घेतले आहे. रिसेप्शनिस्ट मुलीला आरोपी गोकुळ झा यांनी मारायच्या आधी रिसेप्शन मुलीनेच गोकुळच्या वहिनीच्या कानशि‍लात लगावली होती. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. आणि रागाच्या भरात गोकुळने तरुणीला लाथ घातली आणि तिचे केस पकडून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. आता या घटनेचा सीसीटिव्ही व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर रिसेप्शनीस्ट तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या छातीला आणि पायाला मोठ्या प्रमाणात मार लागल्याचे समोर आले आहे. सध्या डॉक्टरांकडून तरुणीवर उपचार सुरू असून एक्स-रे , ब्लड आणि इतर चाचण्या करण्यात येत आहे.

गोकुळ झा याला आज न्यायालयात हजर केले असता. त्याने माझ्यावर चुकीची कारवाई करत. माझ्या भावाला का ताब्यात घेतले असे सांगत त्याने न्यायालयात गोंधळ घातला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. यावेळी पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.

admin
Author: admin

और पढ़ें