Search
Close this search box.

Nitesh Rane On Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू कटेंगे तो बटेंगेचे ब्रँड ॲम्बेसेडर, मराठी न बोलणाऱ्या हिंदूंना मारण्यापेक्षा गोल टोपी वाल्यांना मारुन दाखवा- नितेश राणे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावून सांगितलं. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही तुमच्याशी भांडण नाहीय. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या मीरारोडमधील सभेनंतर मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की, तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू, असं आव्हान राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं. यावर शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा. तिथे मराठी शिकवली जात नाही, तिथे अभ्यास शिकवला जात नाही, असं नितेश राणेंनी सांगितलं.

…तर त्याला सोडला जाणार नाही- नितेश राणे
तुम्ही कानाखाली मारायचा म्हणता, तर नयानगरला जाऊन मारा…तिथे कानाखाली आवाज काढून दाखवा. हिंदूंना मारण्यापेक्षा गोल टोपी वाल्यांना मारुन दाखवा, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं. ठाकरे बंधू कटेंगे तो बटेंगेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत का?, अशी टीकाही नितेश राणेंनी केली. इस्लाम राष्ट्र होऊ नये, यासाठी हिंदूने एकत्र यायला पाहिजे…हिंदूना एकत्र यायला हवं, एक है तो सेफ है, असंही नितेश राणे म्हणाले. हिंदू लोकांसोबत सरकार आहे. हिंदूंवर जर कोणी हात उचलत असेल, तर त्याला सोडला जाणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू. सरकारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न करतोय ? कोण दबाव आणत आहे तुमच्यावर?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. हिंदुत्वाच्या आडून तुम्ही मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही.हे हिंदवी स्वराज्य व्हावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य होते, हिंदूवी नव्हे, हिंदवी. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलेला हा महाराष्ट्र आहे. इथे आमच्यावर बाहेरच्यांनी येऊन राज्य नाही करायचं. मराठी माणूस या ठिकाणचा मालक आहे. इथे व्यवसायाला आलेल्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, माज करू नये, आम्ही तुमच्याशी मराठीतच बोलू. मराठी माणसाला स्वतःहून काही करायची गरज नाही, कुणाच्या अंगावर जायची गरज नाही पण समोरचा कुणी माज घेऊन आला तर ठेचायचाच, असं राज ठाकरे म्हणाले.

admin
Author: admin

और पढ़ें