भारतातील अहमदाबाद इथं Air India च्या विमानाचा भीषण अपघात होऊन या विमान दुर्घटनेमध्ये विमानातील एक प्रवासी वगळता इतर सर्वांचाच मृत्यू ओढावला. हे प्रकरण आणि त्याच्या कटू आठवणी मागे पडत असताना त्यात आणखी एका दुर्घनेची भर पडत असून, अहमदाबाद दुर्घटनेच्याच आठवणी पुन्हा समोर आल्या.
कुठे घडली विमान दुर्घटना? Plane Crash नं जग हादरलं…
लंडन येथील साउथएंड विमानतळावर रविवार (13 जुलै 2025) ला एक भयंकर विमान दुर्घटना घडली. विमानानं धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विमानतळापासून नजीकच झालेल्या दुर्घटनेदरम्यान प्रचंड मोठा स्फोट आणि आगीचे लोट उठताना पाहिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
Beech B200 सुपरकिंग एयर असं दुर्घटनाग्रस्त विमानाचं नाव असून, ते लंडनच्या साऊथएंड विमानतळावकरून नेदरलँडच्या लेलिस्टॅडच्या दिशेनं निघालं होतं. दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी या विमानाचं उड्डाण अपेक्षित होतं. प्राथमिक माहितीनुसार हे विमान ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप प्रकाराचं असल्याचं सांगण्यात आलं.
साधारण 12 प्रवाशांना नेण्याची क्षमता असणाऱ्या या विमानात प्रवासावेळी नेमके किती प्रवासी होती याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी आगीचे लोट उठताना दिसले.
धावपट्टीवरून 40 मिनिटांआधीच झालेलं उड्डाण
ESN Report नं विमान दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देत सोशल मीडियाच्या माध्यमातून या विमानाच्या दुर्घटनेवर उजड टाकत विमानाची दुर्घटना प्रत्यक्षात पाहिल्याचं स्पष्ट केलं. याच धावपट्टीवरून 40 मिनिटांपूर्वीच एका विमानाचं उड्डाण झाल्याचं सांगण्यात आलं.
साउथेंड वेस्ट आणि लेह खासदार डेव्हिड बर्टन-सॅम्पसन यांनी या विमान अपघाताबाबत माहिती देत. साउथेंड विमानतळावर झालेल्या विमान अपघाताची आपल्याला माहिती असल्याचं सांगितलं. कृपया अपघातग्रस्त ठिकाणापासून दूर राहा आणि सर्व आपत्कालीन सेवांना त्यांचे काम करू द्या असं आवाहनही त्यांनी केलं.
