Search
Close this search box.

कर्ज फेडलं नाही म्हणून दोन मुलांना एकमेकांसोबत S** करायला लावला अन् नंतर…; मुंबई हादरली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईत दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्यांना एकमेकांसोबत ओरल सेक्स करण्यासाठी भाग पाडण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तीन आरोपींनी मिळून मुलांना आधी मारहाण केली आणि नंतर ओरल सेक्स करायला लावलं असं पोलीस म्हणाले आहेत. आरोपींमध्ये तिघांचा समावेश आहे. मुलं अल्पवयीन असून त्यांनी त्यांच्याकडून उसणे पैसे घेतले होते.

धीरज (25), भरत (21) आणि पंजूभाई गोस्वामी (45) अशी या आरोपींची नावं आहेत. सेक्स करा असं सागत त्यांनी पीडित मुलांना एकमेकांसोबत शारिरीक संबंध ठेवायला लावले. इतकंच नाही तर त्यांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि मुलांना आपले पैसे परत करण्यासाठी धमकावलं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पीडितांपैकी एक 19 वर्षांचा असून दक्षिण मुंबईत वास्तव्यास आहे. दुसरा अल्पवयीन मुलगा परभणीचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांनी गौतम दिलीप गोस्वामीकडून पैसे उधार घेतले होते आणि ते परत करू शकले नाहीत.

यामुळे संतप्त होऊन गौतमच्या तीन साथीदारांनी पीडितांना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि प्रथम त्यांना पुणे आणि नंतर मुंबईला नेलं. आरोपींनी पीडितांना मुंबईतील भुलेश्वर परिसरातील काळबादेवी रोडवरील एका कार्यालयात नेले, जिथे त्यांनी मुलांना बेल्टने बेदम मारहाण केली. यानंतर त्यांनी त्यांना कपडे काढायला लावले आणि एकमेकांसोबत ओरल सेक्स करण्यास भाग पाडलं.

आरोपी त्यांना सतत “सेक्स करा” असं ओरडत होते. यानंतर दोघांना धमकावण्याच्या उद्देशाने संपूर्ण कृत्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं असं पोलिसांनी सांगितले. गौतमला अटक करण्यात आली आहे आणि उर्वरित तीन आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही मुलांना मानसिक समुपदेशनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें