Search
Close this search box.

Suresh Dhas Son Car Accident: माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नव्हतं, तो ट्रिटमेंटसाठी मुंबईला जात होता; अपघातानंतर सुरेश धसांचं स्पष्टीकरण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस (Sagar Dhas) यांच्या कारने सोमवारी एका दुचाकीस्वाराला उडवल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या अपघातात दुचाकीस्वार नितीन प्रकाश शेळके (वय 34) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. तब्बल 24 तासांनी ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी सागर धस यांच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले आहे. (Maharashtra Road Accident)

माझ्या मुलावर रीतसर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईला एका ट्रिटमेंटसाठी येत होता. अहिल्यानगर जिल्ह्यात अपघात झाला आहे. शेळके नावाच्या तरुणचा यात मृत्यू झाला आहे. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही. त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हचा अजिबात विषय नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजता त्याची सुटका झाली आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.

अपघातावेळी सागर धस हे स्वत: गा़डी चालवत होते. याप्रकरणी सागर धसविरोधात सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून, दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सोमवारी (७ जुलै) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

नितीन प्रकाश शेळके (३४, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. आ. धस यांचा मुलगा सागर सोमवारी (७ जुलै) रात्री पुण्याहून नगरकडे आपल्या आलिशान कारने (एमएच २३, २९२९) येत होता. नितीन शेळके यांचे जातेगाव फाट्यावर हॉटेल सह्याद्री असून हॉटेलवरून रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवर (एमएच १६ डीजे ३७६५) ते पळवे खुर्द येथील घरी जात होते.

नगर-पुणे रस्ता ओलांडताना, भरधाव वेगातील धस यांच्या कारची शेळके यांच्या दुचाकीस जोरदार धडक बसली. त्यात कारखाली चिरडल्याने नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नितीन यांचा चुलतभाऊ स्वप्निल पोपट शेळके हे जोशी वडेवाले यांच्या दुकानाजवळ नितीन यांची वाट पाहत होते. अपघाताची माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले असता, नितीन गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ जखमी नितीन यांना रस्त्याच्या बाजूला घेतले.

चुलतभाऊ अमोल शेळके, सतीश शेळके, नीलेश शेळके यांच्याशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी सर्व जण आल्यानंतर त्यांनी जखमी नितीन यांना सुपा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नितीन यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मंगळवारी (8 जुलै) दुपारी एक वाजेच्या सुमारास नितीन यांच्यावर गावी पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

admin
Author: admin

और पढ़ें