Search
Close this search box.

Rajan Vichare : राजन विचारेंच्या कार्यालयात निवाडा, मराठी ग्राहकानं मारहाण करणाऱ्या दुकानदाराला कानशिलात लगावली, वादात नितेश राणेंची उडी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दोन दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील मोबाईल दुकानामध्ये ग्राहक आणि दुकानामधील कर्मचाऱ्यांच्या वादानंतर मराठी ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. मराठी ग्राहकानं परप्रांतीय दुकानादारा विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर राजन विचारे यांनी त्या दुकानदाराला बोलावून जाब विचारला. दुकानदाराला ग्राहकांची माफी मागायला लावली. यावेळी मारहाण झालेल्या व्यक्तीनं राजन विचारेंसमोरच दुकानदाराच्या कानशि‍लात लगावली. आदित्य ठाकरे आणि मंत्री नितेश राणे यांचा या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

वाद कशामुळं घडला?

हे प्रकरण दोन दिवसांपूर्वीचं आहे. त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल दुकानात रिचार्ज घेण्यासाठी गेलेल्या मराठी ग्राहकाला रिचार्ज करण्यासाठी ताटकळत ठेवल्याने मराठी तरुणाने  जाब विचारल्यानंतर दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती. शिवीगाळ आणि एकमेकांवर ओरडण्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दुकान मालकासह तीन ते चार तरुणांनी मराठी तरुणाला बेदम मारहाण केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

 

राजन विचारेंच्या कार्यालयात काय घडलं?

राजन विचारे यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये  या सगळ्यांना बोलावलं होतं. मार खाणारा मराठी ग्राहक, दुकानदार यांना बोलावलण्यात आलं होतं. दुकानदाराला त्या व्यक्तीसमोर कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. याशिवाय मराठी व्यक्तीला त्या दुकानदाराला मारायला सांगण्यात आलं होतं.

मराठी व्यक्तीच्या तक्रारीवरुन या प्रकरणात दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला होता.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

ही मारामारी झालेला आहे तो वाद मराठी- अमराठी नाहीये. ठाण्यातील आमच्या पदाधिकारी व्यक्तीला पाच सहा लोकांकडून फोन चार्जिंगवरुन मारहाण झाली. त्यावरुन बाचाबाची झाली. मराठी -अमराठीचा वाद नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

नितेश राणे काय म्हणाले?

राजन विचारेंचा व्हिडिओ पाहिला आहे.एवढी हिमत असेल तर भेंडीबाजर किंवा नळबाजार येथे थोबाड फोडून दाखवा.आमच्या हिंदूला असं कोणी मारत असेल सरकार सोडणार नाही, आमचं सरकार कारवाई करणार, असं नितेश राणे म्हणाले.

admin
Author: admin

और पढ़ें