Search
Close this search box.

‘मी पुन्हा येईन’चा मेसेज अन् तरुणीवर बलात्कार; पुण्यातील हादरवून सोडणारा प्रकार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे शहरातील कोंढवा परिसर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरला आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून ‘मी पुन्हा येईन’ असा संदेश ठेवून तीव्र मानसिक धक्का दिला आहे.

ही घटना पुण्यातील कोंढवा येथील एका गार्डेड सोसायटीमध्ये घडली आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून कोंढव्यातील गार्डेड सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सोसायटीमध्ये जाताच त्याने दरवाज्यावर पीडित महिलेला ‘कुरिअर बॉय असल्याचे सांगितले. पण तिथे असणाऱ्या तरुणीने त्याने दिलेले कुरिअर हे तिचे नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र, कुरिअर बॉयने हे कुरिअर तुमचे असून तुम्हाला यावर सही करावी लागेल असा त्या तरुणीसमोर आग्रह धरला.

पीडितेच्या मोबाईलमध्ये आरोपीचा सेल्फी अन्  ‘मी पुन्हा येईन’चा मजकूर

नकार देऊन देखील कुरिअर बॉयने आग्रह केल्यामुळे अखेर त्या महिलेला सेफ्टी दरवाजा उघडून बाहेर यावे लागले. ज्यावेळी ती तरुणी बाहेर आली त्याच क्षणी  त्या आरोपीने त्या तरुणीच्या तोंडावर केमिकल असणारा स्प्रे फवारला. ज्यामुळे ती जागीच बेशुद्ध झाली. यानंतर कुरिअर बॉयने तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर आरोपीने अत्यंत निर्ढावलेपणाने पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला. तसेच ‘मी पुन्हा येईन’ असा मजकूर टाईप करून ठेवला. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

ही घटना उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठा सवाल निर्माण झाला आहे. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचे भान ठेवत गेट पार केला. सुरक्षारक्षकांकडून त्याची फारशी कसून चौकशी झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें