Search
Close this search box.

‘माझ्यावर बलात्कार करताना हॉकी स्टिकने….,’ पीडितेने उलगडला धक्कादायक घटनाक्रम; ‘माझे कपडे उतरवले अन् उभं राहून…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोलकाता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराने हादरला आहे. शनिवारी कोलकात्याच्या कसबा परिसरातील साउथ कलकत्ता लॉ कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाला विद्यार्थिनीवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंतची ही चौथी अटक आहे. कॉलेजचा माजी विद्यार्थी 31 वर्षीय मोनोजित मिश्रा, 19 वर्षीय झैब अहमद आणि 20 वर्षीय प्रमित मुखोपाध्याय यांनी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सुरक्षा रक्षकाच्या खोलीत बलात्कार होत असताना इतर दोन आरोपी उभे राहून पाहत होते अशी माहिती दिली आहे. गुरुवारी संध्याकाळी मुलीने तक्रार दाखल केली असून त्यात दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या बैठकीनंतर संध्याकाळी 7.30 वाजता तीन आरोपींनी- ज्यांना ती फक्त ‘J’, ‘M’ आणि ‘P’ या आद्याक्षरांनी ओळखत होती – तिला घेरलं. तिने म्हटलं आहे की ‘M’ आणि ‘P’ ने तिला ‘J’ असलेल्या खोलीत कोंडले आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

“मी त्यांना लढा दिला, मी रडले आणि मला सोडून देण्याची विनंतीही केली. मी त्यांच्या पायाही पडले, पण त्यांनी जाऊ दिलं नाही,” असं पीडितेने पोलिसांना सांगितलं. “लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतूने त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मी त्यांना सतत मागे ढकलत होते. मी हे करु शकत नाही, माझा प्रियकर आहे आणि माझं त्यावर प्रेम आहे सांगत होते,” असंही तिने म्हटलं.

 

‘मला पॅनिक अॅटक आहे’

माझ्यावर अत्याचार होत असताना, मला पॅनिक अटॅक आला. मी त्यांच्याकडे इनहेलरदेखील मागितला होता अशी माहिती तिने दिली आहे. “मला पॅनिक अटॅक आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. मग ‘जे’ ने ‘एम’ आणि ‘पी’ ला आत येण्यास सांगितले. मी मदत मागितली पण ते मला मदत करत नव्हते. मग मी त्यांना माझ्यासाठी इनहेलर आणायला सांगितलं. ‘एम’ ने ते आणलं. मी ते घेतल्यानंतर बरं वाटलं,” असं ती म्हणाली आणि पोलिसांना सांगितलं की तिने बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पण पीडितेच्या माहितीनुसार, आरोपींनी तिला पकडलं आणि हल्ला सुरुच ठेवला. मुख्य गेट लॉक होता आणि सुरक्षारक्षकानेही मदत केली नाही असंही ती म्हणाली आहे.

तिने सांगितलं की तिला नंतर गार्डच्या खोलीत नेण्यात आले (गार्डला बाहेर काढण्यात आलं). जिथे “‘जे’ ने माझे कपडे उतरवले आणि माझ्यावर बलात्कार करायला सुरुवात केली. मी विरोध केला असताना त्याने मला ब्लॅकमेल केलं. जर कोणाकडे वाच्यता केली तर कुटुंब आणि प्रियकराला मारुन टाकू असं त्यांनी धमकावलं होतं असं तिने सांगितलं आहे.

‘माझ्या डोक्यावर हॉकीने मारलं’

“‘जे’ माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार करत होता. ‘एम’ आणि ‘पी’ उभे राहून सर्व काही पाहत होते,” असं तिने सांगितलं. लैंगिक अत्याचार सुरू असताना डोक्यावर हॉकी स्टिकने मारण्यात आल्याचा दावाही तिने केला आहे.

रात्री 10.50 वाजता मला सोडण्यात आलं आणि कोणालाही याबद्दल न सांगण्याची धमकी देण्यात आली.  “पण आज मी माझ्या मनाची तयारी केली. मला न्याय हवा आहे. कायद्याची विद्यार्थिनी असल्याने, मी आता पीडित आहे आणि मला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी इच्छा आहे,” असं तिने म्हटलं आहे.

राजकीय आरोप प्रत्यारोप

भाजपाने मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा तृणमूलच्या युवा शाखेशी संबंधित असल्याचं सांगत राजकीय वातावरणही पेटवलं आहे. तृणमूल आरोपीचं रक्षण करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. भाजपाने यापूर्वी सोशल मीडियावर मिश्रा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचा असलेले फोटो शेअर केले होता.

तृणमूलने आरोपीचे त्यांच्या युवा शाखेशी संबंध होते हे मान्य करताना हे तथ्य त्याला शक्य तितकी कठोर शिक्षा मिळण्यापासून रोखू शकणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

 

admin
Author: admin

और पढ़ें