Search
Close this search box.

Mumbai Crime News : दारूसाठी पैसे दिले नाही, रागातून कडाक्याचं भांडण, पतीने पत्नीचा गळा आवळला अन्…; घटनेनं मुंबई हादरली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोरेगावच्या (Goregaon) भगतसिंग नगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव गौसिया वासिम शेख (वय अंदाजे ३५) असे आहे.

गौसिया वासिम शेख आणि तिचा पती वसिम रफीक शेख यांच्यात सोमवारी रात्री वाद झाला होता. वसिमने गौसियाकडे दारू खरेदीसाठी पैसे मागितले होते, मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये पहिले शाब्दिक वाद झाला आणि तो हळूहळू हिंसक वळणावर गेला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात वसिमने गौसियाचा गळा आवळला, ज्यामुळे ती जागीच बेशुद्ध पडली.

 

पोलिसांनी आरोपी पतीला ठोकल्या बेड्या 

यानंतर गौसिया वासिम शेख हिला तत्काळ गोरेगाव येथील ट्रामा केअर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बांगूरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी वसिम रफीक शेख याला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास बांगूरनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने फेकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

दरम्यान, त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या वृद्ध आजीला स्वतःच्या नातवाने आरे कॉलनीतल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं, असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्या वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केलं असून, कूपर रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या वृद्ध महिलेचं नाव यशोदा गायकवाड असून, त्या बोलू शकत नाहीत. फक्त “नातू, नातू” इतकंच त्या सातत्याने सांगत आहेत. यामुळे त्यांचा नेमका पत्ता व कुटुंबीय कोण, हे शोधणं पोलिसांसाठी आव्हान बनलं आहे. यशोदा गायकवाड मालाड परिसरात आपल्या नातवाच्या सोबत राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र संबंधित नातवाचं नाव व पत्ता मिळवण्यासाठी पोलिस तांत्रिक तपासावर भर देत आहेत. आरे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, वृद्ध महिलेच्या नातवाचा व इतर कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत करण्यात आलं आहे, अशी माहिती आरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें