Search
Close this search box.

लोकलच्या महिलांमधील मारहाणीचं धक्कादायक सत्य समोर! जखमी कविताने सगळंच केलं उघड, ‘मिरा रोडला…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चर्चगेट-विरार महिला विशेष लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या हाणामारीत एक महिला रक्तबंबाळ झाली होती. 17 जून रोजी मिरा रोड-भाईंदर दरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ दोन दिवसांनी सोशल मीडियावर चर्चेत आला होता. याप्रकरणी कोणीही तक्रार दिली नसल्याने, गुन्हा दाखल नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता जखमी महिलेने काही गंभीर आरोप केले आहेत. तसंच पोलिसांनी पाच दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय झालं होतं?

31 वर्षीय कविता मेदाडकर यांनी विरारला जाण्यासाठी मिरा रोड येथून लोकल पकडली होती. त्या विरारच्या फूलपाडा येथे वास्तव्यास आहेत. लोकलमध्ये चढताना त्यांचा दरवाजात उभ्या 21 वर्षी ज्योती सिंगसोबत वाद झाला. शाब्दिक वाद सुरु असताना काही वेळाने त्यांच्यात हाणामारी सुरु झाली. यादरम्यान ज्योतीने हातातील मोबाईल कविता यांच्या डोक्यात मारल्याने डोकं फुटलं आणि रक्तबंबाळ झाल्या.

वसई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र दोघींमधील हाणामारीचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी दोन्ही महिलांनी तक्रार देणयास नकार दिल्याने समज देऊन सोडलं असल्याची माहिती दिली होती. मात्र कविता यांनी वसई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न करता 5 हजारांची तडजोड केली असल्याचा आरोप केला होता.

रक्तबंबाळ असूनही गुन्हा दाखल न करणं, 5 हजार रुपये घेऊन तडजोड करणं या आरोपांमुळे वसई रेल्वे पोलिसांचे धाबे चांगलेच दणाणले होते. अखेर मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना या प्रकाराचा जाब विचारल्यानंतर शनिवारी पोलिसांनी दोन्ही महिलांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. ज्योती सिंग या महिलेविरोधात  प्राणघातक शास्त्राने हल्ला करणं, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणं आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

admin
Author: admin

और पढ़ें