Search
Close this search box.

महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या वादात विचित्र ट्विस्ट! मुंबईतील एका नामांकित शाळेत वाटली पंजाबी भाषेची पुस्तके

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन  मोठ वाद सुरु आहे. आता या वादात विचित्र ट्विस्ट आला आहे. मुंबईतील एका नामांकित शाळेत पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली आहेत. यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. पुस्तके परत घेण्याची मागणी मनसेने केली आहे.

महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार अशी ठाम भूमिका  मनसे आहे. मुंबईच्या भांडुप परिसरात असलेल्या गुरुनानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली शाळेला धडक. अखेर शाळा प्रशासनाकडून वाटण्यात आलेली पंजाबी पुस्तके परत घेण्यात येणार याचे आश्वासन देण्यात आले.  शाळेच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी राज्यातील मराठी शाळांममध्ये हिंदीची सक्ती नको असं रोखठोक मत व्यक्त केले. जर हिंदी सक्ती केल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला. राज ठाकरेंनी भूमिका घेतल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. भांडुपमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुस्तक विक्री करणा-या दुकानात जाऊन पहिली ते चौथीपर्यंतचे हिंदीचे पुस्तकं विक्रीसाठी आल्यास  त्याची विक्री करू नका असा इशारा दिलाय. त्यानंतरही हिंदींच्या पुस्तकाची विक्री झाल्यास ती सर्व पुस्तक जाळून टाकण्याचा इशारा मनसैनिकांनी दिलाय.

पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यास त्याचे राज्यभरात पडसाद दिसतील असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिलाय.. तसेच राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नसल्याची भूमिकाही संदीप देशपांडेनी घेतली. सरकार आडमार्गानं हिंदी सक्ती करतंय. त्याला मनसे टोकाचा विरोध करणार असल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला.

पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मोदी शाहांच्या गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात हिंदी सक्ती कशासाठी असा सवाल राज यांनी विचारलाय.. शाळा हिंदी सक्ती कशा करतात तेच बघतो, आव्हान समजायचं तर समजा असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय… उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय असा आरोप राज यांनी केलाा.  IAS लॉबीच्या दबावाखाली हा निर्णय घेतला का असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय… या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील मराठीप्रेमींनी आवाज उचलावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय..

admin
Author: admin

और पढ़ें