Search
Close this search box.

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, भाव 1 लाखांच्या खाली, वाचा 24 कॅरेटचे दर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोनं-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गुरुवारी 19 जूनरोजी सोनं चांदीच्या दरात किचिंतशी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातदेखील घसरण झाली आहे. सोनं 200 रुपयांपेक्षा जास्त घसरणीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं सलग तिसऱ्या दिवशी 3400 डॉलरच्या निच्चांकीवर घसरले आहे. तर चांदी 5 दिवसांच्या उच्चांकी वाढीनंतर ब्रेक लागला आहे. चांदी 37 डॉलरच्या खाली पोहोचले आहे. आज देशांतर्गंत वायदे बाजारातदेखील घसरण झाली आहे.

MCX वर सोनं 239 रुपयांच्या घसरणीसह 99,298 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदी या दरम्यान 251 रुपयांनी घसरण होऊन 1,08,315 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. काल चांदी 1,08,566 रुपयांवर स्थिरावली होती. इराण आणि इस्राइल युद्धाचादेखील सोन्याच्या दरांवर परिणाम होताना दिसत आहे. आजचे 22,18 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घेऊयात.

सोनं-चांदी शुद्धता- प्रति ग्रॅम दर

सोनं 999 – 99,454
सोनं 995  – 99056
सोनं 916  – 91100
सोनं 750   – 74591
सोनं 585  –  58181
चांदी 999  – 109412 रुपये/ किलो

तुमचं सोनं किती शुद्ध आहे? 

24 कॅरेटचे सोनं 99.9 टक्के शुद्ध असते
23 कॅरेटचे सोनं 95.8 टक्के शुद्ध असते
22 कॅरेटचे सोनं 91.6 टक्के शुद्ध असते
21 कॅरेटचे सोनं 87.5 टक्के शुद्ध असते
18 कॅरेटचे सोनं 75 टक्के शुद्ध असते
17 कॅरेटचे सोनं 70.8 टक्के शुद्ध असते
14 कॅरेटचे सोनं 58.5  टक्के शुद्ध असते
9 कॅरेटचे सोनं  37.5 टक्के शुद्ध असते

admin
Author: admin

और पढ़ें