भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल केला आहे. रेल्वेने तात्काळ तिकीटांच्या नियमावतील बदल केले आहेत. आता आधारकार्ड शिवाय आणि ओटीपीशिवाय तुम्ही तिकीट बुक करू शकणार नाहीत. 1 जुलै 2025पासून हा नियम तात्काळ तिकीटाच्या बुकिंगसाठी बंधनकारक असणार आहे. तसंच, अधारकार्डवर आधारित OTPदेखील गरजेचा आहे. म्हणजेच जर तुमचं आधारकार्ड IRCTC अकाउंटला लिंक नसेल तर 1 जुलैपासून तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकत नाही.
रेल्वेने मोठा निर्णय घेत तिकीट बुकिंग प्रणालीत बदल केला आहे. रेल्वेच्या या निर्णयामागे एक मोठे कारण समोर येत आहे. तात्काळ तिकीट बुकिंग करताना दलालांकडून किंवा अनेक बनावट ID बनवून ऑनलाइन तिकीट बुक करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळं रेल्वे बोर्डाने सर्व विभागांसाठी तात्काळ तिकीट बुकिंगाचे आदेश दिले आहेत. इतकंच नव्हे कर, रेल्वेच्या नव्या नियमांनुसार 15 जुलै 2025 पासून आणखी एक नवीन नियम लागू होणार आहे. तत्काळ तिकीट बुक करताना आधार व्हेरिफाय मोबाईल क्रमाकांवर आलेला OTP टाकावा लागणार आहे.
रेल्वेने नियम बदलला म्हणजे काय झालं, समजून घ्या!
1 जुलै 2025पासून IRCTC रेल्वे तिकीट वेबसाइट किंवा अॅपवरुन तेव्हाच तिकीट बूक होऊ शकतील जेव्हा युजर्सचे आयआरसीटीचे अकाउंट आधार कार्डशी लिंक असेल व व्हेरिफाय आसेल.
त्याव्यतिरिक्त 15 जुलै 2025 पासून तिकीट बुक करताना आधार कार्ड व्हेरिफाय केल्यानंतर आलेला OTPदेखील द्यावा लागेल.
एजट्ंससाठीही नियम
बल्क बुकिंगला आळा घालण्यासाठी एजंट्सना प्रारंभिक दिवस तत्काळ तिकिटे, बुकिंग विंडोच्या पहिल्या ३० मिनिटांच्या कालावधीत आरक्षित करता येणार नाहीत. वातानुकूलित श्रेणीसाठी हे निर्बंध सकाळी 10 ते 10.30 पर्यंत व बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत लागू राहतील.
आधार कार्ड कसे लिंक करायचे?
– यासाठी प्रथम IRCTC वेबसाइटवर जा आणि लॉगिन करा.
– तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
– ‘माझे खाते’ (My Account) वर जा आणि ‘लिंक युवर आधार’ पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा.
– नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरल्यानंतर, सबमिट करा.
